मोटार कारला लावण्यात येणार्या बंपरगार्डवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली ः भारत सरकारने मोटार कारला लावण्यात येणार्या बंपर गार्ड (बुलबार्स) लावण्यावर बंदी लावण्यात आली आहे. राज्य परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालय यांनी काढलेल्या आदेशान्वये राज्यातील अशा बेकायदेशीर बंपर गार्ड लावण्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सरकारने सांगितले की, कार मध्ये अशा प्रकारचे बंपर गार्उ लावणे मोटर वाहन अधिनियम१९८८ च्या कलम५२ चे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट केले.
सरकारने यावर बंदी यासाठी बंदी लावली आहे की, बंपर लावल्यामुळे फक्त रस्त्यावर चालणार्यांसाठीच नाही तर टक्कर झाल्यावर गाडीतील प्रवाशांनसाठीही घातक होऊ शकते. मागील काही वर्षांपासून भारतात गाडीला अशा प्रकारचे बंपर लावण्या येत आहे. तसेच शोरूममध्येही हे उपलब्ध आहे. वास्तविकता लोंकांची अशी धारणा आहे की, छोटया- मोटया धडकेमुळे बंपर गार्ड गाडीच्या बॉडीला वाचवतो. परंतू तज्ज्ञ लोकांचे म्हणणे आहे की, जोरदार धडकेत बंपर गाडीच्या सुरक्षेसाठी घातक होवू शकते. या बंपर गाडला कारच्या दोन्ही पॉइर्ंटवर फिक्स केले जाते. धडकेच्या वेळी जोर संपूर्ण गाडीवर न येतो फक्त या दोन पॉईटवर येते, त्यामुळे गाडीचे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. याशिवाय कारमध्ये एअर बॅगचे सेंसर लावलेले असतात. बंपर गार्ड लावल्यामुळे सेंसर कामकरीत नाही. आणि अपघाताच्या वेळी एअरबॅग उघडत नाहीत. तज्ज्ञांचे हेही सांगणे आहे की, कंपनी कारमध्ये या प्रकारची रचना करीत आहेत की, रस्त्यावर चालणार्या लोकांना धडक झाल्यास त्यांना कमीत कमी नुकसान होईल. परंतू बंपर गार्ड लावल्यामुळे रहदार्यांना जास्त दुखापत होवू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *