रस्त्यावर वाहनांचा भार

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) मागील नऊ महिन्यात तब्बल ८१ हजार नवीन वाहनांची भर पडली आहे. शहरासह या विभागात येणार्या उर्वरित तालुक्यांमध्ये डिसेंबर अखेर वाहनांची घनता १६ लाखांपर्यंत पोहचली असून, वाहने रस्त्यावर उतरण्याचा वेग गत वर्षीपेक्षा वाढला आहे.

नाशिक ‘आरटीओ’त नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, येवला, निफाड, सुरगाणा, चांदवड, पेठ, दिंडोरी या तालुक्यांचा तर मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागातर्ंगत मालेगाव, कळवण, सटाणा, देवळा आणि नांदगाव या तालुक्यांचा समावेश होतो. नाशिक ‘आरटीओ’त एप्रिल ते डिसेंबर या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये ८१ हजार २६४ नवीन वाहनांची नोंदणी झाली. मार्च २०१७ मध्ये या तालुक्यांमध्ये वाहनांची एकूण घनता १४ लाख ६३ हजार ५८२ इतकी होती. डिसेंबर २०१७ पर्यंत भर पडलेल्या नवीन वाहनांच्या संख्येमुळे आता हा आकडा १५ लाख ४४ हजार ८४६ इतका झाला आहे. गत वर्षीच्या तुलनेत वाहन खरेदीचा वेग वाढलेला दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *