शिवशाही नुसती बसेसमध्ये नको तर कामातही हवी!

उद्धव ठाकरे यांचा दिवाकर रावते यांना सल्ला

मुंबई ः मंत्री येतात आणि जातात, पण ठसा उमटविणारा मंत्री हवा. बसेसच्या माध्यमातून नुसती शिवशाही नको तर ‘शिवशाही’ ही कामातूनही दिसली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वपक्षीय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना उद्देशून कानपिचक्या दिल्या.
एसटी महामंडळातर्फे शनिवारी कर्मचार्यांचा नवीन गणवेश वितरण सोहळा आणि योजनांचे सादरीकरण मुंबई सेन्ट्रल येथील मुख्यालयात पार पडले. यावेळी रावते यांचा एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून केलेल्या कामांचा लेखाजोगाही कार्यक्रमात मांडण्यात आला. या सादरीकरणानंतर ठाकरे यांनी रावते यांना कार्यक्रमातच कानमंत्र दिला. ‘जे बोलतो ते करतो असा मंत्री हवा,’ असेही आपल्या भाषणातून ठाकरे यांनी रावते यांना कानमंत्र दिला.
एसटी महामंडळाचा गणवेश वितरण सोहळा पार पडतानाच स्मार्ट कार्ड, बस स्थानके आणि बसेसची स्वच्छता, पर्यावरणपुर स्वच्छ प्रसाधनगृहांची निर्मिती, लाल डब्याचे लाल परीमध्य रुपांतर, तीन हजार ५०० मार्गस्थ निवार्यांची उभारणी, चालक-वाहक विश्रांतीगृहांचा कायापालट आणि एक हजार कर्मचार्यांसीठी निवासस्थान या योजनांचे सादरीकरण करण्यात आले. राज्यातील ३१ आगारांमध्ये एकाचवेळी गणवेश वाटपाचा कार्यक्रमकरण्यात आला. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे यांनी परिवहन मंत्री हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे जे बोलतात ते करुनही दाखवतात. जे बदल एसटीत होत आहेत ती कामगिरी शिवसेनेला साजेशी आहे, असे गौरवोद्गारही काढले. कर्मचार्यांच्या वेतन मुद्दयावरही बोलताना उध्दव ठाकरे यांनी, एसटीच्या योजना दाखविल्या, पण वेतनाचे काय असा सवाल उपस्थित केला. कर्मचार्यांच्या न्यायहक्काचे लवरकच त्यांना द्या. नाहीतर पूर्वीचे दिवस गेले. त्यामुळे न्यायहक्कासाठी रांगेत उभे राहिले, तर लाच्छनास्पद राहिल. कर्मचार्यांच्या वतीने मी तुमच्याकडे मागणी करतो यावर लवकरच तोडगा काढण्यात यावा.
तत्पूर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कामगार करार लवकरात लवकर करण्याची इच्छा असल्याचे सांगत कामगार संघटनांनी आपला हट्ट बाजूला ठेवला पाहिजे आणि प्रशासनाशी चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. तसेच एसटीचे यावेळी आधुनिकीकरण करण्यावरही भर दिला जात असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, परिवहन सचिव मनोज सौनिक, एसटी उपाध्यक्ष रणजित सिंह देओलही उपस्थित होते.
एसटीच्या नवीन योजना
* एसटीच्या मार्गस्थ निवार्यांचा कायापालट करताना सार्वजनिक बांधकामविभागाचे सहकार्य घेतले जाणार आहे. या निवार्यात प्रसाधनगृहे तसेच गरजेनुसार उपहारगृहे देखिल उभारली जातील.
* विद्याविहार येथे एसटीच्या जागेवरच एक हजार ७२ घरांचे निवासी संकुलही उभारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन लवकरच होणार आहे.
* चालक आणि वाहकांच्या विश्रांतीगृहाचा कायापालटही केला जाणार आहे. यात योगकक्ष, व्यायामशाला आणि अन्य सुविधा असतील.
* १ मे पासून २०१८ पासून स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित होईल. ठराविक रक्कमेचे स्मार्ट कार्ड घेवून त्याद्वारे त्या रकमेइतका एसटीचा प्रवास करणे शक्य होणार आहे.
एसटीतील चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचार्यांसह एकूण १६ विविध पदांच्या कर्मचार्यांना नवीन गणवेश देण्यात येणार आहे. त्याची सुरुवात ६ जानेवारीपासून करण्यात आली. एसटीचा जवळपास एक लाखाहून अधिक कर्मचारी आहे. मार्च महिन्यापर्यंत सर्व कर्मचार्यांना नवीन गणवेश उपलब्ध होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *