एमआयडीसीतील रस्ते खड्ड्यांतच

डोंबिवली : एमआयडीसीतील निवासी विभागातील सर्वच रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे अजूनही कायमआहेत.खड्‌ड्यांमधील धुळीमुळे रहिवासी आणि वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत.विशेष म्हणजे, एमआयडीसीच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

१ जून २०१५ ला २७ गावे पुन्हे केडीएमसीत समाविष्ट झाली.त्यामुळे एमआयडीसीतील रस्त्यांच्या दुरुस्तीची नेमकी जबाबदारी कोणाची, असा यक्षप्रश्न रहिवाशांना पडला होता.मात्र, दोन महिन्यांपूर्वी डोंबिवलीत आलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मात्र मालमत्ताकर गोळा करणाक्तया केडीएमसीचीच रस्तेदुरुस्ती करण्याची जबाबदारी असल्याचे सांगत हा संभ्रमदूर केला.त्यानंतरही दुरुस्तीसंदर्भात हालचाली केडीएमसीकडून झालेल्या नाहीत.मध्यंतरी एमआयडीसीतील सेनेच्या पदाधिकक्तयांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांना पत्र पाठवून सत्ता असूनही दुर्लक्षित आहोत, अशा शब्दांत घरचा आहेर दिला होता.तसेच पाठपुरावा करूनही परिस्थितीत सुधारणा होत नाही.सत्ताधारी म्हणून नागरिकांच्या रोषाला आम्हाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे.जर याबाबतीत तातडीने हालचाल न झाल्यास मालमत्ताकर न भरण्याचा आम्ही विचार करू, असा इशाराही या पदाधिकाक्तयांनी महापौरांना दिला होता.मात्र, त्यांच्या पत्रालाही केराची टोपली दाखवली गेली.

सध्या निवासी विभागातील शेवटचा बसस्टॉप, भाजीगल्ली, मिलापनगर तलाव रोड, सुदर्शननगर, साईबाबा मंदिर रोड यासह अन्य बहुतांश रस्ते खराब आहेत.यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *