पूर्व नागपूर आरटीओला जागा देता का जागा!

पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कर्मचार्यांच्या रिक्त पदांमुळे अडचणींना तोंड देत असतानाच आता त्यांच्यापुढे जागेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या हे कार्यालय भाडयाच्या जागेवर आहे. करार संपल्याने भूखंड मालकाने जागा सोडण्यासाठी नोटीस बजावली आहे. कार्यालय हलवल्यास काही दिवस कामकाज बंद हो नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
नागपुरात नागपूर शहर आणि पूर्व नागपूर, अशी परिवहन विभागाची दोन कार्यालये आहेत. सिव्हिल लाईन्सचे शहर कार्यालय स्वत:च्या जागेवर असून डिप्टी सिग्नल परिसरातील पूर्व नागपूर आरटीओचे कार्यालय सध्या किरायाच्या जागेवर सुरू आहे. नवीन इमारत बांधकामसुरू असले तरी ते पूर्ण होण्यासाठी दीड ते दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. या कार्यालयाच्या भाडे कराराची मुदत चार ऑक्टोबर २०१७ ला संपली. भूखंड मालकाने भाडयाची रक्कमकमी आहे म्हणून कराराचे नूतनीकरण करण्यास नकार दिला. प्रशासनाने महिन्याला एक लाख ७० हजार रुपये याप्रमाणे भाडे निश्चित करून तसा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. मात्र, शासनाने तो फेटाळला. पूर्वी या जागेचे भाडे ५० हजार रुपये महिना होते. त्यात नैसर्गिक वाढ म्हणून १० टक्के वाढ करून ते ५५ हजार करण्याची तयारी दर्शवली. त्यापेक्षा अधिक भाडे देणे शक्य नसल्याचे कळवले आहे. भाडे वाढणार नसल्याने भूखंड मालकाने जागा सोडण्यासाठी नोटीस बजावली आहे. दरम्यान, कार्यालय इतरत्र हलवून इतरत्र नेण्यासाठी शासनाला लाखो रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. शिवाय स्थानांतरणालाही काही दिवस लागणार आहे. त्यामुळे या काळात कामे थांबण्याची शक्यता आहे. दरम्यान, या जागेच्या भाडयाबाबत सार्वजनिक बांधकामविभागाने सर्वेक्षण केले होते. त्यांनी एक लाख ७० हजार प्रति महिना भाडे योग्य असल्याचा अहवाल दिला होता हे येथे उल्लेखनीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *