पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांना जिजाऊरत्न पुरस्कार

पैठण ः पैठण तालुक्याचे भूमीपूत्र व अहमदनगर येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेे शरद गोर्डे यांना राजमाता जिजाऊरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

बहुचर्चित व राज्यभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात तपासाधिकारी म्हणून शरद गोर्डे यांनी कामपाहिले. आरोपींच्या विरोधात निपक्षपाती व अहोरात्र परिश्रमघेत कमी कालावधीत आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करून कोर्टात सादर केले. या सर्व पुराव्याचा आधारे आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेलेली आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकमयांनीही कार्याची दखल घेत शरद गोर्डे यांचे पत्र पाठवून कौतुक केले आहे. दरम्यान पैठण तालुका राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समीती समाजात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींना दरवर्षी राजमाता जिजाऊरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करत असते. यावर्षीचा पुरस्कार पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांना जाहीर करण्यात आला. १३ जानेवारीला पैठण येथील आमदान संदिपान भुमरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. शरद गोर्डे हे पैठण शहराचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दत्तात्रय गोर्डे यांचे धाकटे बंधू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *