२० वर्षांवरील रिक्षा व काली पिवळी टॅक्सीवर बंदी

स्कूल बसेस व स्कूल व्हॅनसाठी १५ वर्षे वयोमर्यादा निश्चित, १ जुलैपासून निर्णय लागू

मालेगाव : जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जिल्ह्यातील ऑटोरिक्षा व काळी-टॅक्सी यांची वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि.१ जुलै २०१८ नंतर २० वर्षांवरील ऑटोरिक्षा व काळी-टॅक्सी रस्त्यावर चालताना आढळून आल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
वाहनांचा परवाना वैध असला तरीही ३० जून २०१८ पर्यंत नवीन वाहन किंवा २० वर्षाखालील दुसरे वाहन या परवान्यावर नोंद केल्याशिवाय परवान्याच वापर करता येणार नाही. प्रवाशांची सुरक्षितता व जुन्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता निर्णय घेण्यात आला आहे. स्कूल बसेस व स्कूल व्हॅनसाठी १५ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मूळ नोंदणीपासून १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांना स्कूल बसचा परवाना दिला जाणार नाही.अशी वाहने रस्त्यावर आढळून आल्यास अटकावून ठेवण्यात येतील.आजमितीस अशी वाहने रस्त्यावर असणाक्तया सर्व वाहनधारकांनी ३० जून पर्यंत आपल्या वाहनाच्या भवितव्याबाबत निर्णय घ्यावा.नवीन वाहन खरेदी करावे किंवा आपले परमीट जमा करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी केले आहे.
मालेगाव तालुक्यातील सुमारे २३० ऑटोरिक्षा आणि ४७५ काळी-टॅक्सी या २० वर्षांपूर्वीच्या आहेत.विद्यार्थ्यांची वाहतूक करणाक्तया स्कूल बसेस व स्कूल व्हॅनसाठी १५ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.मूळ नोंदणीपासून १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांना स्कूल बसचा परवाना दिला जाणार नाही.अशी वाहने रस्त्यावर आढळून आल्यास जप्त केली जाणार आहे. १ जुलै २०१८ नंतर २० वर्षांवरील ऑटोरिक्षा व काळी-टॅक्सी रस्त्यावर चालताना आढळून आल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बीडकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *