सायकल सेवा ‘पंक्चर’!

ठाणे महापालिकेने मोठा गाजावाजा करत सुरू केलेला सायकल प्रकल्प शुभारंभ होऊन तीन महिने उलटले तरी प्रत्यक्षात आलेला नाही. ठाणेकरांना अंतर्गत प्रवासासाठी सायकली भाडयाने देण्याच्या या प्रकल्पाचे सत्ताधारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोठया दिमाखात उद्घाटन करण्यात आले होते. पूर्व द्रुतगती महामार्गालगत एका बडया मॉलला लागून या सायकली रचून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, ही सुविधा सहजरीत्या उपलब्ध व्हावी यासाठी प्रकल्प सुविधेत काही तांत्रिक बदल केले जात आहेत. त्यामुळे सायकलसेवेसाठी ठाणेकरांना किमान महिनाभर तरी वाट पाहावी लागणार आहे. २ फेब्रुवारीला सराव सफर पूर्ण झाल्यावर काही दिवसांनी शहराच्या अंतर्गत भागात सायकल प्रवास करता येणार आहे.
शहरातील अंतर्गत प्रवासासाठी स्वस्त, सुसह्य आणि प्रदूषणरहित पर्याय देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने हरित सायकल प्रकल्पाची आखणी केली आहे. ऑगस्टमध्ये युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विवियाना मॉल येथे सायकल थांब्याचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील ५० महत्त्वाच्या बसथांब्यांवर सायकल प्रकल्प उभारून ५०० सायकली नागरिकांसाठी ठेवण्यात येणार असल्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. प्रत्येक सायकल थांब्यावर दहा सायकली ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र अनेक महिने उलटूनही या प्रकल्पातील सायकल रस्त्यावर धावत नसल्याने प्रकल्प बारगळल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
जाहीर केलेल्या ५० थांब्यांपैकी विवियाना मॉल, कोरममॉल, रेमंड कंपनी, माजिवडा, पोखरण रस्ता अशा ठिकठिकाणच्या २५ सायकल थांब्यांचे बांधकामपूर्ण झाले आहे. दीड हजारांहून अधिक नागरिकांनी या संदर्भातील मोबाइल ऍपवर नोंदणीही केली आहे. मात्र थांब्यांवर सायकल उपलब्ध नसल्याने नागरिकांची निराशा होत पार्किंगची उपलब्ध जागा ऍपद्वारे कळणार
या सायकलींवर बसवण्यात येणार्या जीपीएस यंत्रणेमुळे सायकलींच्या ठिकाणांची माहिती मिळणार आहे. जीपीएस यंत्रणेचे कामसुरू असून नवीन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
‘आय लव्ह सायकलिंग’ ऍपच्या माध्यमातून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. या ऍपशिवाय अन्य ऍपची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. या ऍपवर सायकलने किती किमी अंतर कापले, सायकलस्वाराने किती ऊर्जा खर्च केली (कॅलरीज बर्न) याची माहिती मिळणार आहे.
एखाद्या ठिकाणाहून स ायकल घेऊन निघाल्यावर कामाच्या वेळी सायकल पार्क करण्यासाठी कोणत्या थांब्यावर जागा उपलब्ध आहे, हे ऍपवरच कळणार आहे. सध्या या प्रणालीचे कामसुरू आहे, असे सायकल सेवा प्रकल्प प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *