चारशे वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप

नगर ः वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आरटीओकडून वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्यासह वाहनचालकांचे प्रबोधन करण्याची मोहिमहाती घेण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमसुरू असून सुपा टोलनाका परिसरात चारशे वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्यात आले. तसेच कर्णकर्कश हॉर्न वाजवणार्या वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात आले. वाहनचालक वाहन चालवताना अनेकदा विनाकारण हॉर्न वाजवतात. वाहतूक कोंडीच्या वेळी पुढील गाडी निघाल्याशिवाय आपली गाडी मार्गस्थ होणार नाही, हे माहित असतानाही हॉर्न वाजवले जातात. ट्रकचालकांकडून यात सर्वाधिक योगदान दिले जात आहे. त्यामुळे या वाहनचालकांचे प्रबोधन करण्याचे कामआरटीओने सुरू केले आहे. आरटीओ अधिकारी महामार्गांवरील टोलनाक्यांवर थांबून याबाबत वाहनचालकांना माहिती देत आहेत. चारचाकी वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप नसल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक तसेच चारचाकी अवजड वाहनांना टेप नसल्याने रात्रीच्या वेळी या वाहनांचा इतर वाहनचालकांना लवकर अंदाज येत नाही. अपघातही होतात. त्यामुळे आरटीओने या वाहनांवर लक्ष प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *