दुचाकी घसरून तरुण ठार

कुडाळ : पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मंगेश आरेकर (४५, रा. घोगळेवाडी, खानोली) या तरूणाचा जागीच ठार झाला. मंगेश आरेकर हा कुडाळहून खानोली येथे आपल्या घरी जात होता. पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथे
त्याची दुचाकी घसरून तो दुचाकीसह रस्त्यावर आदळला. यात त्याच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच ठार झाला. दुचाकीचा अचानक ब्रेक लागल्यामुळे दुचाकी रस्त्यावर घसरली. त्यामुळे मंगेशचे डोके रस्त्याच्या बाजूपट्टीवर आदळून तो गंभीर जखमी झाला, अशी माहिती उपस्थित नागरिकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *