प्रादेशिक परिवहन अधिकारी विजयजी लांडे सेवानिवृत्त, गोविंदजी सैंदाणे रुजू

धुळे ः येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विजयजी लांडे हे ३१ जानेवारी २०१८ रोजी सेवा निवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या आप्तेस्टांसह अधिकारी व कर्मचारी वर्गाने येथील हॉटेल रेसीडेन्सी येथे छोटाखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून उप परिवहन आयुक्त, मुंबई श्री. गोविंदजी सैंदाणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंधेरी, मुंबई श्री. अभयजी देशपांडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक श्री. भारतजी कळसकर आदी उपस्थित होते. श्री. विजयजी लांडे यांनी मोटर वाहन निरीक्षक ते प्रादेशिक परिवहन अधिकारी पर्यंतच कर्तव्य बजावले. त्यांची एक मुलगी अमेरिकेत स्थित आहेत

प्रादेशिक परिवहन अधिकारीच्या उच्च पदावर असतांना देखील त्यांनी सर्वसामान्य नागरीकांप्रमाणे स्वतःला समजमून कायद्याच्या चाकोरीत राहून प्रत्येक कामकरण्याचा त्यांचा प्रयत्न होता. धुळ्यात त्यांची प्रकृती खुप चांगली राहत नव्हती. नेहमीच औषधोपचार घेऊन ते आपले कर्तव्य बजावत होते. परंतू आपल्या कडे येणार्या प्रत्येक नागरिकास कुटुंबाच्या प्रमुखाप्रमाणे वागुणक देऊन आलेल्या प्रत्येकाचे समाधान करण्याचे कामते करत होते. सांहेबांच्या मोठया मुलीने स्टेज वरून आपल्या वडीलाच्या सेवापुर्ती सोळयात दोन शब्द बोलातना सर्वांच्या डोळयात पाणी आणले. ती म्हणाली की माझे वडील शासकीय सेवा बजावत असतांना नेहमीच बाहेर असायचे. त्यामुळे आमची आईच आमचे सर्वकाही करत असे. शाळेच्या एका कार्यक्रमात वडील आले. त्यांना स्टेजवरून दोन शब्द बालण्यास सांगितले तेव्हा त्यांना मी कोणात्या इयत्तेत आहे. हे देखील त्यांना माहित नव्हते. मोटार वाहन विभागातील नोकरीविषयी सर्वांना वेगळात भ्रमअसतो. परंतू सत्य परिस्थिती काही वेगळीच असते. याचे ते उदाहरण आहे. नोकरी करतांना आपण कुटुंबीयांना वेळ देऊ शकत नाही. हेच पोलिस आणि आरटीओ विभागाद्दल म्हणता येईल. विजयजी लांडे यांनी धुळे येथे आपला कार्यभार पुर्ण करताना अडचणींचा सामाना केला. परंतू त्यांनी अत्यंक प्रेमळ पद्धतीने व वागणुक देऊन सर्वांना हवेहवेसे वाटणारे विजयजी लांडे यांनी आपली सेवा देऊन सेवा पुर्तीचा सोहळा करून धुळे कार्यालयास शेवटा सलामकेला. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी साप्ताहिक रस्ता सुरक्षा परिवाराकडून खुप सार्या शुुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *