फ्लेक्स बोर्डमुळे पुणे सोलापूर महामार्ग जीवघेणे

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर महामार्गावर असणा-या भराव पुलाला सध्या अनधिकृत फ्लेक्सचा विळखा बसला असून, या फ्लेक्सचा त्रास महामार्गावरील वाहनांनादेखील होऊ लागला आहे. चुकीच्या पद्धतीने बांधलेले फ्लेक्स जोराच्या वा-याने खालच्या बाजूने उलटून बांधलेल्या दिशेने वर जावून महामार्गावर अडचण ठरत आहे, त्यामुळे सुसाट वेगाच्या या महामार्गावर दुचाकीस्वार व वाहनचालकांचा ताबा सुटून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, या अनधिकृत फ्लेक्स बोर्डवर कोणाचेच नियंत्रण नसून कार्यक्रमानंतर महिने उलटूनदेखील हे तसेच उभे राहतात त्यामुळे याचा मोठा त्रास येथील नागरिकांना व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

कुरकुंभ येथील मुख्य चौकातून बारामतीकडे जाताना पुलावरील एखादा फ्लेक्स कधी खाली पडेल याची शाश्वती नाही. बजयाच वेळा काही फ्लेक्स जोराच्या वाजयाने आजवर पडलेसुद्धा आहेत. मात्र, यातून काहीच बोध न घेता तसेच बिनधास्तपणे हे बोर्ड उभे असतात. पुलाखाली काही प्रमाणात छोटे व्यावसायिक बसलेले असतात त्यामुळे त्यांच्या जिवालादेखील धोका असून, त्यांच्या माध्यमातून येणाजया सामान्य ग्राहकांनादेखील याचा नाहक त्रास होत असतोच. अगदी नागरिकांच्या गर्दीच्या वेळेसदेखील हे बोर्ड पडल्याची उदाहरणे आहेत. मात्र, सुदैवाने यामध्ये अजून तरी कुठलीही इजा किंवा हानी झालेली नाही त्यामुळे एखाद्या घटनेची वाट पाहत बसण्यापेक्षा याबाबत उचीत कारवाई अत्यंत गरजेची असल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत.

पुणे-सोलापूर महामार्ग नव्याने रुंदीकरण झाला तेव्हा या महामार्गादरम्यान असणाजया प्रत्येक गावाला भराव पूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे रोज हजारोंच्या संख्येने वाहने अगदी सुसाट वेगाने यावरून प्रवास करीत असतात. एकेरी वाहतूक असल्याकारणाने अवजड वाहनेदेखील वेगातच असतात अशातच महामार्गावर अचानक आडव्या येणाजया एखाद्या वस्तूचा अंदाज न आल्याने गंभीर अपघात झालेल्या घटना यापूर्वी या परिसरात झालेल्या असताना अशा प्रकारे निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या जिवाला वेठीस धरणे किती योग्य आहे. रात्रीच्या प्रवासावेळी तर याची गंभीरता आणखीनच वाढत असते.महामार्गावरील थोड्या प्रमाणात असणाजया वळणावरदेखील अचानक वाहन नियंत्रण करणे अत्यंत जिकिरीचे असल्याने अपघात होत आहेत.

कारवाई करण्यास उदासीनता

महामार्गावरील अशा बेकायदेशीर फ्लेक्सवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा आहे मात्र ते कारवाई न करता फक्त निगराणी करीत आहेत. मात्र एखाद्याचा जीव गेल्यावरच यंत्रणेला जाग येते हे तर ठरलेलेच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *