लवकरच धुळ्यातही धावणार ई- रिक्षा

दिल्ली ः केंद्र सरकारच्या केंद्रीय मोटर यान नियम, १९८९ मोटर वाहन अधिनिय १९८८ कलम२१२ (१) नुसार भारत सरकारने सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालय अधिसूचना संख्यांक सा. का. नि. ६६६ (अ), १७ सप्टेंबर २०१४ प्रमाणे भारतोच राजपत्र, असाधारण, भाग २, खंड ३, उपखंड (१) मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. केंद्रीय सरकार, केंद्रीय मोटर वाहन नियम१९८९ आणि संशोधन करण्यासाठी मोअर यान अधिनियम१९८८ ची कलम२७, कलम६४ आणि कलम११० अणि कलम१३७द्वारे खालील गोष्टींसाठी करण्यात येत आहे. ई रिक्शा तीन चाकी बॅटरी प्रचलित वाहन अभिप्रेत आहे. ज्यात प्रवाशांना भाडे तत्वावर शेवट पर्यंत सोडण्यासाठी कटिबद्ध आहे. असे वाहन चार पेक्षा जास्त प्रवासी, ज्यात चालकाचा समावेश नसेल, आणि एकुण चाळीस किलोग्रामपेक्षा कमी सामान घेवून जाण्यासाठी तयार करण्यात आली आहे. याची मोटरची शक्ती २००० वॉट पेक्षा अधिक नाही.

वाहनाची जास्त गती ५० किलो मीटर प्रति तास पेक्षा जास्त नाही. नियम९४ मध्ये उपनियम३ च्या खंड पाच मध्ये दुचाकी, तिनचाकी आणि चारचाकी सायकलच्या रुपात शब्दातंच्या जागेर दुचाकी, तिनचाकी, चारचाकी साइकिल, ई- रिक्खा आणि ई- गाडी की परिस्थती ठेवले जातील. ठाणे पालिका ताफ्यात सौर उर्जा रिक्षा दाखल
ठाणे ः शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी महापालिका प्रशासनाने सौर ऊर्जेवर धावणार्या रिक्षांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. सौर ऊर्जेवर धावणारी अशीच एक रिक्षा महापालिकेच्या ताफ्यात सोमवारी दाखल झाली. या रिक्षाचा वापर क्षमतेची चाचपणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यानंतर महिला व बालकल्याण समितीमार्फत आखण्यात येणार्या विविध योजनांच्या माध्यमातून या रिक्षा उपलब्ध करून देता येतील का, याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. शहरात अधिकाधिक प्रमाणात पर्यावरणपूरक रिक्षांचा वापर वाढावा यासाठी हा प्रयत्न आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
ठाणे शहरातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपक्रमराबबिण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सौर ऊर्जेवरील रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिकेच्या ताफ्यात सौर ऊर्जेवर चालणारी एक रिक्षा दाखल झाली असून या उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी सकाळी महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते झाला. पर्यावरणामधील घातक वायू कमी करण्याच्या उद्देशातून हा उपक्रमहाती घेण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या रिक्षामध्ये चार प्रकारच्या बॅटरी असून त्या आठ तास चार्ज कराव्या लागतात. त्यानंतर रिक्षा कमीतकमी १०० किमीचे अंतरापर्यंत चालू शकतात. या रिक्षाची केवळ एकदा नोंदणी करावी लागणार आहे. या रिक्षाची किंमत १ लाख ८० हजारांपर्यंत आहे, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून पेट्रोलवर चालणार्या रिक्षांऐवजी आता सौर ऊर्जेवरील रिक्षांना यापुढे महत्त्व दिले जाणार आहे. महिला बालकल्याण तसेच इतर योजनेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना व्यवसायासाठी यापुढे सौर ऊर्जेवर चालणारी रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेल्या रिक्षाच्या वापर क्षमतेची तपासणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *