वाहनचालकाचा निष्काळजी पणा, शाळकरी मुलाचा करुण अंत

नागपूर : वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. पीयूष श्रीकांत घोडे (वय १२) असे या मुलाचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजापेठ भागात राहत होता.सोमवारी रात्री ७ च्या सुमारास पीयूष त्याच्या वस्तीत सायकल चालवित होता. त्याच्या घराजवळ टी पॉईंंट आहे. तेथे एमएच ३१/ सीबी ६७९४ च्या चालकाने टाटा एस वाहन उभे केले. वाहनात मागेपर्यंत आलेले लोखंडी पत्रे (टिना) लादले होते. कोणतीही धोक्याची सूचना किंवा संकेत नव्हते किंवा वाहनचालकाने तेथे मागे उभे राहण्याचीही काळजी घेतली नाही. त्यामुळे काहीसा वेगात सायकलने आलेला पीयूष सायकलसह टिनावर आदळला. त्याचा गळा कापला गेल्याने तो गंभीर जखमी झाला.

तशाही अवस्थेत तो उठून उभा झाला आणि बाजूला असलेल्या घराच्या दिशेने पळत सुटला. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी आरडाओरड केली. बाजुलाच पीयूषचे वडील उभे होते. त्यांनी लगेच पीयूषला जवळ घेतले. त्याला गंभीर अवस्थेत डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोन दुचाकीची टक्कर दोघांचा मृत्यू
पिंपळनेर (धुळे) – ताहराबाद – पिंपळनेर रस्त्यावर कातरवेल गावाजवळ शेलबारी घाटात झालेल्या ३ दुचाकीच्या धडकेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्या युवकाचा मृत्यू उपचारासाठी नेत असताना वाटेत झाला.
पिंपळनेर पोलिस स्टेशनजवळ राहणारा लक्ष्मण उर्फ (लकी) मिलिंद बैसाणे हा सटाणाकडुन पिंपळनेरकडे येत असतांना पिंपळनेरकडून हळदी समारंभासाठी पती पत्नी मोटार सायकलने जात होते. आज दुपारी दीडच्या सुमारास शेलबारी घाटात दोन्ही दुचाकींची जोरदार टक्कर झाली. त्यात दौलत भटु भदाणे (वय ५८ वषॅ, रा. उंभटीॅ. ता.साक्री) हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी कमलबाई दौलत भदाणे यांना जबर धडक बसली. दुसर्या दुचाकीवरील लक्ष्मण (लकी) मिलिंद बैसाणे (वय २३ वर्षे) व त्यांच्यासोबत असलेला गणेश सदाशिव सोनवणे (वय १८ वर्षे) हे गंभीर जखमी झाले. जखमी लकी व गणेश यास धुळे येथे उपचारासाठी नेत असताना लकीची प्राणज्योत साक्रीतच मावळली. साक्री ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. कमलाबाई भदाणे यांच्यावर पिंपळनेर येथील डॉ. जितेश चौरे यांच्याकडे प्राथमिक उपचार करुन नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे तर गणेश सोनवणे हा धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असुन त्याचीही स्थिती गंभीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *