सिन्नर-शिर्डी चौपदरीकरण

शिर्डी ः सिन्नर-शिर्डी या ५१ कि. मी. चौपदरी महामार्गाचे कामलवकरच सुरू होणार असून, त्यासाठी ८८० कोटींची टेंडर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काढली आहे. हायब्रिड ऍन्युइटी मॉडेलद्वारे हा रस्ता तयार करण्यात येणार असून, त्यासाठी टप्याटप्याने ठेकेदाराला पैसे दिले जाणार आहेत. या महामार्गावर ५.५ कि. मी.चा पालखीमार्ग व मुसळगाव येथे बायबास केला जाणार आहे. या महामार्गामुळे नाशिक व शिर्डीचे अंतरही कमी वेळेत पूर्ण करता येणार आहे. नाशिकरोड ते शिर्डी हे अंतर ८४ कि. मी. असून, नाशिकरोड ते सिन्नर या चौपदरीकरणाचे कामजवळपास पूर्ण झाले आहे. त्यात या ५१ कि. मी. चौपदरीकरणाची भर पडणार आहे. दोन धार्मिक स्थळांना जोडणारा हा रस्ता असल्याने चौपदरीकरणामुळे कमी वेळेत हे अंतर पार करता येणार आहे. शिर्डीला येणारे भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वला दर्शनासाठी येतात. त्यामुळे त्यांना या रस्त्याचा उपयोग होणार आहे.

राज्यात १९०० कि. मी.चे महामार्ग सिन्नर-शिर्डी प्रमाणेच राज्यात १९०० कि. मी. अंतराच्या रस्त्यांसाठी टेंडर नोटीस काढण्यात आली आहे. त्यात राज्यातील प्रमुख मार्ग आहेत. देशात हेच काम१० हजार ४६० कि. मी. केले जाणार आहे. हायब्रिड ऍन्युइटी मॉडेल बीओटी-टोल मॉडेलनंतरचे हायब्रिड ऍन्युइटी हे नवे मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये ठेकेदाराचा खर्च हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टप्याटप्याने देणार आहे. त्याचप्रमाणे टोल मात्र प्राधिकरण गोळा करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *