’तेजस्विनी‘च्या टेंडरला अत्यल्प प्रतिसाद

महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यासाठी खरेदी केल्या जाणार्या तेजस्विनी बसच्या टेंडर प्रक्रियेला बस उत्पादक कंपन्यांकडून प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) या बस खरेदीसाठी तिसर्यांदा टेंडर प्रक्रिया राबविण्याची येत असून, यापूर्वी दोन वेळा राबविलेल्या टेंडर अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकारने पुण्याला ७० तेजस्विनी बस उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने या ७० बसच्या खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली होती. तत्कालीन अध्यक्ष तुकाराममुंढे यांनी या बसचे स्पेसिफिकेशन निश्चित केले होते. त्या स्पेसिफिकेशननुसार बस उपलब्ध करून देण्यास उत्पादक कंपन्यांनी असमर्थता दर्शविल्याचे कळते. त्यामुळेच यापूर्वी दोन्ही वेळेला टेंडर प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नसल्याचे पीएमपीतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता काही स्पेसिफिकेशन कमी करून पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तेजस्विनी बसची चाचणी म्हणून पीएमपी प्रशासनाने गेल्या वर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी गर्दीच्या मार्गावर ममहिला विशेष बसफसोडल्या होत्या. महिला प्रवाशांना गर्दीच्या मार्गांवर सुरक्षित व आरामदायी प्रवास उपलब्ध व्हावा, या उद्देशाने तेजस्विनी बसचे नियोजन करण्यात आले आहे. या बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर, त्यांचे नियोजन कसे करावे, यासाठी पीएमपीकडून पुणे व पिंपरी चिंचवडच्या सहा मार्गांवर तेजस्विनी बसच्या धर्तीवर महिला विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. सकाळी नोकरी, कॉलेज किंवा व्यावसायानिमित्त बाहेर पडणार्या महिलांसाठी सकाळी आणि सायंकाळी या बस सोडण्याचे नियोजन आहे. मात्र, या सर्व प्रकाराला येत्या मार्च महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहेत, तरीही अद्याप त्या बसची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *