माझा बळी का?

सर्व साधारण पणे समाजात एक म्हण प्रचलित आहे. चूक नसतांना माझा बळी का? याचा अर्थ आपणा सर्वांना चागलाच परिचित आहे.हे आपण कधीना कधी तरी म्हटलेही असेलच असाो ! आजचे जग हे आधुनिक जग आहे अर्थात जग आता वैश्विक खेडे झाले आहे.विकासाच्य अनेक योजना आता मानवाच्या पायाशी लोळण घेत आहेत.याचा फायदा जसा मनुष्याच्या प्रगतिसाठी झाला तसा तो विनाशालाही हातभार लाऊ लागला.याचा दोष कोणाला द्यायचा कारण सर्वच जण काही या लाटेवर स्वार नाहीत काही लोकांना तर दोन वेळचे अन्नही मिळत नाही.हे सागण्याचे कारण म्हणजे या मानवाच्या विकासात दळणवळणाची साधणं आली आणि त्यानं सुसाट धावायला सुरवात केली.आधुनिकतेच्या नावाखाली आपण सृष्टीने घालुन दिलेल्या नियमांची पायमल्ली करायाला सुरवात केली.ज्या पध्दतीने अनेक सुविधा उपलब्ध झाल्या त्याच पध्दतीने वाहतुक व्यवस्थाही विकसीत झाली ती आज इतकी विकसित झाली आहे की,पारंपारिक वाहन व्यवस्था बदुलुन नवीन आधुनिक वाहनं बाजारात यायला लागली.
आपण नेहमी म्हणतो साभांळुन जां ! पण असं होतांना मात्र आज दिसत नाही कोणासही असे वाटणार नाही की, प्रवास करतांना किंवा वाहन चालनवितांना माझा जीव जाणार नाही याची आपण काळजी घेत असतो पंरतू सार्वजनिक ठिकाणी आपण याची काळजी घेतो का ? बहुतांशी उत्तर हे नाही असेच येईल.काही प्रमाणात याचे उत्तर हो असेही असेल पण त्याचे प्रमाण अत्यल्प असेच आहे.आज दर तासाला मानवाचा बळी अपघातात जातो. बर्¶ाचदा आपण ऐकतो त्याची काहीच चूक नव्हती मग चूक कोणाची ? असा प्रश्न साहाजिक पडतो, रस्त्यावर वाहन चालवितांना आपण सहज म्हणतो रस्ता आहे इतकी वाहन चालतात अपघात होणार आहेतच,पंरतू हे ईतक्या सहजपणे बोलतांना आपण असा विचार नाही करत की माझ्यामुळे कोणाचाही जीव जाणार नाही याची मी वाहन चालवितांना काळजी घेईल. आपण आज पहातो महाविद्यालयातील युवक युवती बिनदिक्कत वाहन चालवितांना मोबाईल हाताळतात, इतके व्यस्त आहोत का आपण ? की दोन मिनटं थाबुन आपण बोलु शकत नाहीत, हेड फोन व्दारे बोलत असतांना अनेक अपघात झाल्याचे आपण बघितले आहेत. रस्ता ओलांडातांना किंवा मागच्या गाडीचा अदांज न आल्याने अनेक अपघात होतात. यासाठी प्रत्येकांने आपल्या सोबत इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत : वाहन चालवितांना दोन्ही बाजुला आपले लक्ष असणे जसे गरजेचे आहे तसेच ते आवश्यकही आहे. बज्याचदा काहीही चूक नसतांना अपघातात दुखापत किंवा मृत्यू झालेले आपण पहातो या अपघातात जखमी झालेला कर्ता असेल तर त्याच्य परीवाराचे काय होईल तसेच त्याचा मृत्यू झाला तर किती मोठे संकट त्या परीवारावर येईल याचे भान आजच्य या आधुनिक युगात कितपत आहे हा संशोधनाचा भाग आहे. परंतू आपण सर्वांनी वाहन चालवितांना काळजी घेतली तर यात थोडाफार तरी बदल होईल. खाजगी वाहन व्यवस्था असो वा सरकारी प्रवास हा सुरक्षितच झाला पाहीजे असा आग्रह आपला सर्वांचा असला पाहीजे अवैध प्रवासी वाहतुकी मुळे अनेकांचे संसार चालातात हे आपणास माहित आहे अनेक सुशिक्षीत युवक या व्यवसायात आहेत पंरतू जास्तीची अपेक्षा यातून मोठ्यासंकटांना सामोरे जावे लागते हे ही आपण पाहिले आहे. गेल्या वर्षी अनेक जिल्ह्रयात किती लोकांचे प्राण गेले आहेत हे आपण पाहिले आहे. तरी देखिल आपण काहीही बोध या घटनापासून घेत नाही खरंच आपण इतके व्यस्त झालो आहोत का? आपल्याला आपल्या जीवाचीही पर्वा नसते, इतके आपण स्वार्थी झालो आहोत की आपल्याला कोणत्याही नियमांची जाणीव नाही किंवा ते मी पाळणारच नाही अशी शपथ आपण घेतलीय का? आपला जीव जसा महत्वाचा आहे तसाच तो इतरांचाही महत्वाचा आहे. सुसाट वेगवान गाड्या चालवून व कोणाचीही पर्वा नकरता वाहन चालविण्यात कसला पुरुषार्थ आहे. आजच्य तरुणाईला या बाबतीत काहीही देणे घेणे नाही किंवा गरजही वाटत नाही असे का होते याचा विचार आपण करणार आहोत की नाही ? सुरक्षित वाहन चालविण्यासाठी नियमांची आवश्यकता आहे का? याचा विचार प्रत्येकाना करायला हवा फक्त मी माझा विचार करुन चालणार नाही तर इतरांचाही विचार मी वाहन चालवितांना करेल असा सकारात्मक विचार प्रत्येकाना आज करणे आवश्यक आहे. खाजगी वाहन असो वा सरकारी वाहन त्याची व रस्त्यावरुन जाणाज्या प्रत्येकाची सुरक्षितता ही माझ्या हाती आहे हा विचार रुजविणे आज महत्वाचे आहे. शासकीय पातळीवर रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जातो त्यात आपण सहभागी होतो फोटो सेशन होते बातम्या येतात शाळेतील मुलांना वाहन चालवितांना काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले जाते. हे न कळणारे कोडे आहे जे मुल वाहन चालवित नाहीत त्यांना आपण मार्गदर्शन करतो वाहन कसे चालवायचे जे वाहन चालवतात त्यांना आपण यात सहभागी करुन घेत नाहीत किंवा तशी गरजही वाटत नाही. फक्त काही तरी राबवित आहोत यासाठी सर्व काही चालते रस्ता सुरक्षा सप्ताह राबविणे यातून काय साध्य होते यात जाण्याची गरज नाही पण आपण नेहमीच सुरक्षित वाहन चालविले तर अशा सप्ताहांची आवश्यकता राहणार नाही.
शासन हे त्याचे कामकरीत असते अंमलबजावणी ही आपल्याला करायची असते मी वाहन चालविंतांना मोबाईलवर बोलणार नाही इतरांची काळजी घेईल इतके जरी आज प्रत्येक नागरिकाने केले तरी माझी चूक नसतांना माझा बळी का? असं म्हणण्याची वेळ येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *