ई-वाहनांचा पाच क्षेत्रात विस्तार होणार

मुंबई : पर्यावरणपूरक ई-वाहन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आता केवळ दुचाकी नाही तर त्याखेरीज पाच क्षेत्रांवर ‘फोकस’ केला जाणार आहे. यासाठी वाहननिर्मिती करणार्‍या कंपन्यांच्या ‘एसएमईव्ही’ या संघटनेने पुढाकार घेतला आहे. ‘सोसायटी फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया’ (एसएमईव्ही) ही देशातील १२ प्रमुख ई-वाहने तयार करणाजया कंपन्यांची संघटना दहा वर्षांपासून कार्यरत आहे. आतापर्यंत संघटनेचा ‘फोकस’ केवळ इलेक्ट्रिक दुचाकीवर होता; पण २०३०पर्यंत देशातील सर्व वाहने इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निश्चित केले आहे. हे लक्ष्य केवळ दुचाकीद्वारे पूर्ण होणे अशक्य असल्याने एसएमईव्हीने आता संघटनेत रचनात्मक बदल केला आहे.

एसएमईव्हीची वार्षिक बैठक अलीकडेच झाली. त्यामध्ये दुचाकीखेरीज बसेस व मालवाहतुकीसाठी छोटे टेम्पो हे व्यावसायिक वाहनसुद्धा इलेक्ट्रिक श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार आता व्यावसायिक ई-वाहन, तीनचाकी (ई-रिक्षा, ई-कार्ट), दुचाकी (वेगवान ई-सायकली) व ई-चारचाकी (वैयक्तिक मोटारीसह हलकी व्यावसायिक वाहने) या चार प्रकारांत येत्या काळात अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यावर संघटना ‘फोकस’ करणार आहे. या चारही श्रेणीत वाहननिर्मिती करणाजया कंपन्यांशी समन्वय साधण्यासाठी चार उद्योजकांची प्रमुख म्हणून बैठकीत निवड करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *