विद्यार्थ्यांनी शाळा बुडवू नये यासाठी शिक्षकाने केली बस खरेदी

उडुपी, कर्नाटक-गाव कोणतेही असो काम पहिले पाहिजे.उडुपी जिल्ह्यातील बाराली गावातील मुलांनी शाळा अर्ध्यात सोडू नये यासाठी शाळेतील शिक्षक राजाराम स्कूल बस चालकाचाही जबाबदारी सांभाळत आहेत. आता रोज सकाळी राजाराम लवकर उठून मुलांना त्यांच्या घरी जाऊन आणत आहेत. शाळेत राजाराम यांच्यासह केवळ तीन शिक्षक आहेत. शाळा लांब असल्यामुळे अनेकांनी अर्ध्यातच ती सोडली. अखेर ही गळती थांबवण्यासाठी राजाराम यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने बस खरेदी केली.

राजाराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी बाराली गाव परिसरातील मुलांनी शाळेत येणे बंद केले. कारण शोधले तर कळले की, शाळेत येण्यासाठी रस्ता खराब असल्याचे दिसले. विद्यार्थ्यांना ५ ते ६ किमी अंतर पायी चालावे लागत होते. भीतीपोटी ग्रामस्थांनी आपल्या मुलींना शाळेतच पाठवणे बंद केले होते. अचानक एक दिवस शाळेचा माजी विद्यार्थी विजय हेगडे भेटला. तो बंगळुरूमध्ये प्रॉपर्टी मॅनेजर कंपनी चालवतो. त्याच्याशी शाळेबाबत चर्चा सुरू होती. लांबचे अंतर व खराब रस्त्यामुळे लोक मुलांना शाळेत पाठवत नसल्याचे त्याला सांगितले. विद्यार्थ्यांची खूप वेगाने गळती होत होती. हे असेच राहिले तर शाळा बंद करावी लागेल. विद्यार्थ्यांना परत शाळेकडे कसे वळवावे हे कळत नव्हते. यावर मुलांना आणण्यासाठी हेगडेने मला बस खरेदी करण्याची कल्पना सुचवली. सहा महिन्यांत माजी विद्यार्थी विजय व गणेश शेट्टी यांनी बस खरेदी करण्यासाठी पैसे दिले. या पैशातूनच बस खरेदी केली. चालकाला कमीत कमी सात हजार रुपये वेतन द्यावे लागते. त्यामुळे स्वत: बस चालवण्याची जबाबदारी उचलली. मी बस चालवायला शिकलो. कल्पना यशस्वी झाली.असे त्यांचे सांगणे आहे. मुलांनी शाळा अर्ध्यात सोडू नये यासाठी शाळेतील शिक्षक राजाराम स्कूल बस चालकाचाही जबाबदारी सांभाळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *